वर्सोवा-घाटकोपर मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आता पास आणि टोकन साठी तिकीट खिडक्यांवरील रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही. या प्रवाशांची रांगेतून सुटका करण्यासाठी ‘स्किप क्यू’ या अंतर्गत मेट्रोचे तिकीट गुरुवार पासून मोबाइलवरही उपलब्ध झाले आहे. सुरुवातीला हि सेवा पेटीएम अॅप वर उपलब्ध झाली असून थोड्याच दिवसात मुंबई मेट्रोच्या अॅपवरही हे तिकीट मिळेल. मोबाईल तिकीट सुविधेकरिता मेट्रो-1 ने पेटीएम सोबत भागीदारी केली आहे. यापूर्वी प्रवासाने टोकन घेण्यासाठी, टॉपअप करण्यासाठी, एकमार्गी तसेच परतीच्या प्रवासाचे टोकन घेण्यासाठी तिकीट खिडकीवर तसेच ग्राहक केंद्रात रांगेत उभे राहावे लागत असे. कार्यालयीन गर्दीच्या वेळी हि रांग मोठी असते. मात्र हि रखडपट्टी आता संपली आहे. टोकन किंवा स्मार्ट कार्ड वापरण्या ऐवजी प्रवासी आता मेट्रोच्या अॅटोमेटेड फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर मोबाईल अॅपवर येणाऱ्या ‘ क्युआर कोड’ या सुविधेमुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकाच्या बाहेरही आपल्या सोयीने प्रवासाची तिकिटे खरेदी करता येतील.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews